अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धचा कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील काष्टीनजीक परिक्रमा शिक्षण संकुलाजवळ रविवार दि.१२ रोजी सायंकाळी घडली.
ठार झालेली व्यक्ती ही घारगाव येथील आहे. याबाबत सविस्तर असे की, रविवारी सायंकाळी दोघेजण दुचाकीवरून दौंड नगर रस्त्याने दौंडकडे चालले होते.
दौंडकडून काष्टीकडे येणाऱ्या टाटा एसची काष्टी येथील परिक्रमा शिक्षण संकुलाजवळ दुचाकीला धडक बसली.
यात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दौंडला नेण्यात आले परंतु त्याठिकाणी उपचारादरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मयत व्यक्ती ही कामानिमित्त दौंड येथे राहाते घारगाव येथे वडिलांच्या वर्षश्राद्धच्या कार्यक्रमासाठी ती व्यक्ती आली होती तो कार्यक्रम आटोपून आज दौंडला परत जात असताना हा अपघात झाला.