अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- औद्योगीक कार्यस्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील – योगेश गलांडे अहमदनगर औद्योगिक कार्यस्थळावर सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील.
त्यामुळे कामगारांनी स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क असणे आवश्यक आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार हा महत्वाचा घटक असून त्याची सुरक्षा ही कंपनी व्यवस्थापन व त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी केले.
२ नोव्हेंबर या औद्योगिक सुरक्षा दिनाचे औचित्यसाधून एमआयडीसी येथील एक्साईड बॅटरीज कंपनी येथे कामगारांसाठी सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. श्री गलांडे पुढे म्हणाले की, कार्यस्थळावर होणारे सर्व अपघात हे टाळता येण्याजोगे असतात.
स्वतःची व इतरांची सुरक्षा ही प्रत्येक कामगारांची स्वत:ची जबाबदारी आहे. कार्यस्थळावर नेहमी सतर्कतेने व सुरक्षा नियमांचे पालन करणे हे कामगार व कंपनी यासाठी हितावह आहे. यावेळी श्री गंलाडे यांनी कार्यस्थळावर घ्यावयाच्या जबरदारीच्या उपाय योजनांची माहीती उपस्थित कामगारांना दिली.
ज्या कामात आपण प्रशिक्षित नसाल ते काम करु नये, योग्य साधने व उपकरणांचा वापर योग्य त्या पद्धतीनेच करावा, काम सुरु करतांना संभाव्य धोके लक्षात घ्यावेत,
काम करताना शॉर्टकट टाळावा व योग्य त्या नियमावली प्रमाणेच काम पूर्ण करावे, कार्यस्थळावर सैल कपडे व निसरड्या पादत्राणांचा वापर कटाक्षाने टाळावा. सेफ्टी हेल्मेट, गॉगल्स, ग्लोव्हज, सेफ्टी शूज आदी साधनांचा वापर करावा अशा सुचना श्री गंलाडे यांनी यावेळी केल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved