पेरॉलवर असलेला फरार आरोपीला पुण्यातून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जामखेड पोलीस ठाण्यात खुन प्रकरण मधील आरोपी रामकिसन उत्तम साठे, (वय ५० वर्ष, जामखेड) यास सेशन कोर्ट अहमदनगर यांनी सदर गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा भोगत असताना सदर आरोपी हा आपले मुळगावी जवळके ता.जामखेड येथे अभिवचन रजेवर आला होता. अभिवचन रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर न होता फरार झाला.

त्यावरून येरवडा जेल येथील पोलीसांनी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याअनुषंगाने जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीद्वारा बातमी माहिती मिळाली

की या गुन्हयातील फरार आरोपी नामे रामकिसन उत्तम साठे हा विठ्ठलवाडी,देहु रोड ता.हवेली जि.पुणे येथे आपली ओळख लपवुन राहत आहे.

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि.संभाजी गायकवाड यांनी याबाबत वरीष्ठांना कळवुन तपास पथकास या‍ठिकाणी जाण्यास कळविले होते.तपास पथकातील पोलीस अंमलदार हे तात्काळ रवाना होऊन देहु रोड,

पोलीस स्टेशन जि.पुणे यांची पेालीस मदत घेऊन नमुद बातमीच्या ठिकाणी सापळा लावुन आरोपी नामे रामकिसन उत्तम साठे यास जागीच ताब्यात घेण्यात आले. आरोपीस ताब्यात घेवुन जामखेड पेालीस स्टेशनला आणले असता त्यास न्यायालयात हजर केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24