‘त्या’ खुनातील आरोपीस जामीन मंजूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे : कुख्यात वाळू माफिया गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.अप्पा लोंढे वाळू तस्करीत सक्रिय होता. २०१५ मध्ये लोणीकाळभोरमध्ये त्याचा खून करण्यात आला होता.

या खून प्रकरणात विष्णू यशवंत जाधव यास अटक केली होती. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून किरकोळ तसेच गंभीर गुन्ह्य़ातील आरोपींना जामीन देण्यात येत आहे.

जाधवला नुकताच न्यायलयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. यास जमीन मिळाल्यानंतर त्याच्या काही समर्थकांनी जल्लोष केला होता. त्याच्या विरुद्ध संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाला ठुसे (वय ३९, रा.अष्टापूर,ता. हवेली), गणेश चोंधे (वय ३८,रा. महंमदवाडी, हडपसर), गणेश काळे (वय ३०,रा.वडगाव शेरी), सोपान मडके (वय ३८, रा. काळेपडळ, हडपसर), शिरीष कारले (वय २६, रा.खेरपाल, जि.अहमदनगर),

संतोष गव्हाणे (वय २८), योगेश गव्हाणे (वय २८), दादा गव्हाणे (वय २८, दोघे रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), नितीन सोडनवर (वय ३८,रा. बोरीपार्धी, ता. दौंड),

अंकुश मल्लाव (वय ४०,रा. येरवडा), संदीप जगदाळे (रा. करडे, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस नाईक सचिन रणदिवे यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24