महाराष्ट्र

आंदोलनकर्त्यांवर कारवाईचा बडगा ! तब्बल 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाने आता तीव्र स्वरुप धारण केलंय. तर दुसरीकडे आता राज्य सरकारनेदेखील कडक पवित्रा धारण केलाय.

राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नसल्याने एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला.

एसटी महामंडळाचे कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून संपावर आहेत. राज्यभरात हा संप सुरु असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. एसी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही संपकऱ्यांची मुख्य मागणी आहे. या आंदोलनादरम्यान एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्यादेखील केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा जीआर काढला. मात्र, हा जीआर अमान्य असल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी संप चालूच ठेवला आहे.

संपाच्या 11 व्या दिवशीही तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे सोमवारी राज्यातील 250 एसटी आगरापैकी 223 आगर बंद होती.

तेथून एकही गाडी बाहेर जाऊ शकली नाही. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत संप मागे घेतला जणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर एसी महामंडळाने निलंबनाचे हत्यार उपसले आहे.

आतापर्यंत 16 विभागातील 45 आगारांमधील 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, भंडारा, औरंगाबाद, नागपूर,

जालना अशा विभागांचा समावेश आहे. नांदेड, यवतमाळ सांगली या तीन विभागामध्ये एकूण 150 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24