अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- कोव्हिडनंतर लवकरच आम्ही पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु करणार आहोत”, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. मिशन बिगेन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
तसेच अद्याप कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. याच धर्तीवर मुंबईतील नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
यावेळी त्यांनी रेस्टॉरंटना रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयालाही आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केलं आहे. मुंबईत गेल्या वर्षी 26 जानेवारी 2020 रोजी नाईट लाईफ सुरु झाली.
मात्र त्यानंतर काही दिवसांनी लगेचच कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन केल्याने नाईट लाईफ सुरु होताच बंद झालं. मात्र आता नाईट लाईफ सुरु करण्याच्या हालचाली आदित्य ठाकरे यांनी सुरु केल्या आहेत.
याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, “आता आपण रेस्टॉरंटला 1 पर्यंत सुरु करण्याची परवानगी दिली आहे. हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू”
मुंबई नाईट लाईफ 26 जानेवारी 2020 पासून मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले ठेवण्यात येत होते. हे सर्व त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आले होते.