अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा उशिराने सुरू झाल्या. यामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे.इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज इंजिनीअरिंग आणि फार्मसीचे वेळापत्रक जाहीर झाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
९ ते १५ डिसेंबरपर्यंत नोंदणीची प्रक्रिया तर अर्ज पडताळणीची प्रक्रिया १६ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागणार आहे. १८ डिसेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
यंदा इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले होते.