आमदार विनायक मेटे यांच्याकडील जाहिरातीची उधारी वसूल करण्यासाठी थेट वर्तमानपत्रातच जाहिरात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-बीड जिल्ह्यातील एका वृत्तपत्राने ही शक्कल लढवली आहे.शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांच्याकडील जाहिरातीची उधारी वसूल करण्यासाठी थेट वर्तमानपत्रातच जाहिरातच छापण्यात आली आहे

या वर्तमानपत्राने छापलेल्या बातमीनुसार दिवाळी अंक २०१७, २०१८ आणि २०१९ च्या वर्धापनदिनाला आमदार मेटे आणि त्यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी जाहिरात दिली होती. त्याचे पैसे अद्याप दिले नसल्याचं या बातमीमधून सांगण्यात आलं आहे.

जाहिरातीचे पैसे मागण्यासाठी थेट बातमी छापण्याचा हा प्रकार राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या बातमीत मेटे यांचे कौतुक करण्यात आले आहे.

मात्र, पुढे त्यांनी या बातमी मागचे प्रायोगन उधारी मागण्याचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राचा डोलारा सांभाळताना आपल्याला आठवण राहिली नसेल किंवा आम्हीच आपणास आठवण करुन देण्यास कमी पडलो असू.

म्हणून आपल्याला आज जाहीर आठवण करुन देत आहोत’, असं या बातमीमध्ये छापण्यात आलं आहे. या बातमीप्रमाणे विनायक मेटे यांच्याकडे ७७ हजार रुपये, तर त्यांचे भाऊ रामहरी मेटे यांच्याकडे २० हजार रुपये उधारी बाकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24