Maharashtra News : रत्नागिरी, देवगडमधील हापूस आंब्याला मोहर फुटण्याअगोदरच कोल्हापुरात दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. येथील शेती उत्पन्न बाजार समितीमधील फळांचे
घाऊक व्यापारी डी. एम. बागवान व जुबेर बागवान यांच्या दुकानात हा आफ्रिकन हापूस आंबा दाखल झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील मालावी शहरातून आलेल्या या आंब्याच्या १५ नगाच्या बॉक्सचा दर ३ हजार ८०० रुपये इतका आहे. फळांचा राजा मानलेल्या हापूस आंब्याला अद्याप मोहरही फुटलेला नाही.
मार्च ते मे महिना या कालावधीत रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याचे आगमन होते; परंतु तब्बल सहा ते सात महिने अगोदरच कोल्हापुरात दक्षिण आफ्रिकन हापूस आंबा दाखल झाला आहे. या हापूस आंब्याची चव आणि गोडवाही कोकणातील हापूस आंब्याच्या तोडीचाच आहे.
त्यामुळे या आंब्याला ग्राहकांची मागणी चांगली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही कोल्हापुरातही हा दक्षिण आफ्रिकेतील हापूस मागवत असल्याचेही बागवान यांनी सांगितले.