राजकारणात उतरल्यानंतर शरद पवारांचं खरं स्वरूप समजलं, त्यांचा अभ्यास अर्धवट असतो…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-राजकारणात नसताना आपल्याला शरद पवार हे मोठे आणि अभ्यासू नेते आहेत, असं वाटत होतं. मात्र राजकारणात आल्यानंतर ते खूप छोटे नेते असल्याचं आपल्या लक्षात आलं.

त्यांचा कुठल्याही विषयावरचा अभ्यास अर्धवट असतो, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलीय. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते.

यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर त्यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेतल्याचं ते म्हणाले. यासाठी खोलात जाऊन त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. मराठा समाज ओबीसींमध्येच घुसूच शकणार नाही, अशी सोय त्यांनी केल्याचंही पाटील म्हणाले.

राजकारणासाठी काही लोक समाजासमाजामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली. राजकारणासाठी सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांचा शर्ट पकडायला हवा, असंही त्यांनी म्हटलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24