राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून पवारांनी थेट पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर राज्यातील संकट अद्याप कमी झाले नसल्याने राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आलेली नाही. याचाच विरोध करण्यासाठी भरतोय जनता पक्षाने राज्यभर आंदोलन छेडलं आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली. आणि हिंदुत्वाबाबात काही गोष्टीही सांगितल्या होत्या.

त्या पत्रावरून राज्यात नवं वादळ निर्माण झालं आहे. राज्यापालांनी पत्रात जी भाषा वापरली ती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना अजिबात रुचलेली नाही. याबाबत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.

धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर ठरवून अवहेलना करणार काय?, असा परखड सवाल शरद पवार यांनी मोदींना केला आहे. तसेच राज्यपालांचं हे वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरचं असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.

राज्यपाल हे घटनात्मक पद असून त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणं हे योग्य नाही. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली ती त्या पदाला शोभणारी नाही. असे पवार म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24