अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :मध्यंतरी झालेले काँग्रेस व शिवसेनेचे वाद, तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवेळी झालेली काँग्रेसची धुसफूस आणि आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या केलेल्या
अंतर्गत बदल्यांना राज्य शासनाने रविवारी दिलेली स्थगिती यामुळे या सरकारमध्ये धुसफूस सुरु असल्याचे चीत्र निर्माण झाले आहे.
आणि आता पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. ते बाहेर येत नाहीत तोच संजय राऊत यांनी मोठी घोषणा करून टाकली आहे.
देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ उडणार असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.
ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल असे सुतोवाच राऊत यांनी केले आहे. काही वेळापूर्वीच राऊत यांनी ट्विट करून पवारांची मुलाखत घेत असलेला फोटो पोस्ट केला आहे.
तसेच सामनामध्ये ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात येणार असून वृत्त वाहिन्यांवरही ती पाहता येईल असे राऊत म्हणाले आहेत. शरद पवार हे चीन ते महाराष्ट्रातील घडामोडींबाबत जोरदार बोलल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
विविध कारणावरून शिवसेना व राष्ट्रवादी यांत वितुष्ट निर्माण झाल्याने ठाकरे सरकार पडणार असल्याचीही चर्चा रंगली असतानाच याच वेळी संजय राऊतांनी पवारांच्या मुलाखत घेतल्याचे जाहीर केल्याने सरकारमध्ये आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews