अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तरास नामक प्राण्याचा वावर वाढू लागल्याच्या घटना ऐकण्यात आल्या आहेत.
या प्राण्याकडून काही जणांवर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. अकोले तालुक्यातील राजूर मध्ये या प्राण्याचा वावर वाढू लागला आहे.
जंगलात खायला नसल्याने बिबट्या, तरास गावाकडे येऊ लागल्याने नागरिकमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याबाबत लक्ष्य देण्याची गरज आहे.
सध्या थंडी पडल्याने लोक फिरण्यासाठी उशिरा बाहेर पडतात. राजूर परिसरात आज सकाळी ६ वाजता चितळ वेढा रस्त्याने तरास आले.
ते थेट झुडपात बसलेल्या डुकरावर हल्ला करत एका मोठ्या डुकराला पकडले. पण इतर डुक्कर जिवाच्या आकांताने ओरडले त्याच वेळी आजूबाजूचे भटके कुत्रे एकत्र येत भुंकू लागले. फिरण्यासाठी गेलेले, संतोष पंडित व इतर चौघांनी ओरडा सुरू केल्याने तरास आपला जीव वाचवत रस्त्याने पळत सुटले.
बिबट्यानंतर आता या प्राण्याचा वावर वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved