राऊत-फडणवीस भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही सरकार पाडणार नाही, पण…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात काल ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात गुप्त बैठक झाली.

या बैठकीनंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची चर्चा होऊ लागली. परंतु आता या चर्चेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फुलस्टॉप दिला आहे. ते म्हणाले के, ही भेट कोणत्याही राजकीय हेतूने नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अशा भेटी होत असतात,

त्यात बातमी असते असे नाही. गेली नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असल्याचे कधीही म्हटलेले नाही. हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडणार असेच आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही. ती आमची संस्कृती नाही,

असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही भेट फडणवीस यांच्या ‘सामना’च्या मॅरेथॉन मुलाखतीसाठी झाल्याचे समजते. दरम्यान, काल या भेटीबाबत काही सांगता येणार नाही असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं होत.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं, “संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती असे ते म्हणाले होते. आपण जे बोलू त्यात काटछाट होणार नसेल, तरच आपण ‘सामना’ला मुलाखत देऊ, असे फडणवीस यांनी सांगितले होते.

त्याचे स्वरूप ठरवण्यासाठी आज या दोघांची भेट झाली, असे दरेकर म्हणाले. बिहारची निवडणूक झाल्यानंतर फडणवीस ही मुलाखत देणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24