विघ्नहर्ता हॉस्पिटलनंतर अनोळखी महिलेची माऊली सेवा संस्था बनली आधार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अनोळखी वृद्ध महिलेवर विघ्नहर्ता हॉस्पिटलने उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली. उपचारानंतर ती महिला पूर्णत: सुदृढ झाली असून त्यांची गेली १०-१२ दिवसांपासून आजपावेतो कोणीही संर्पक साधून ओळख पवटून दिलेली नाही.

वृत्तपत्रामध्ये अनोळखी महिलेची बातमी वाचून माऊली सेवा संस्थेचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांनी डॉ. महेश वीर यांच्याशी संपर्क साधून त्या अनोळखी महिलेला विघ्नहर्ता हॉस्पिटलनंतर माऊली सेवा संस्थेने आपल्या सोबत घेऊन जाऊन आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे.

माऊली संस्था ही अनाथांची व गरजूंची आधार केंद्र आहे. डॉ. धामणे दाम्पत्य हे समाजातील अशा अनाथ व गरजूंसाठी खरे देवदूतच आहेत, असे डॉ. महेश वीर यांनी व्यक्त केले. विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर अनोळखी महिलेला अनाथांची व गरजूंसाठी आधार केंद्र असलेल्या माऊली सेवा संस्थेत

आपल्या सोबत घेऊन जात असताना संस्थेचे डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे, डॉ. महेश वीर, डॉ. अखिलेश धानोरकर, डॉ. अमित कुलांगे, डॉ. सुप्रिया वीर, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. नरेंद्र मरकड, डॉ. शैलेंद्र मरकड आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ. धामणे म्हणाले की, समाजामध्ये ज्या अनाथ व गरजूंना कोणी नाही, त्यांच्यासाठी माऊली सेवा संस्था काम करत आहे. वृत्तपत्रातून बातमी वाचल्यानंतर डॉ. महेश वीर यांच्याशी संपर्क साधून त्या अनोळखी महिलेची विचारपूस केली. त्या महिलेला कोणी नसेल तर आम्ही घेऊन जाण्यासाठी येतो.

विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या सर्व संचालकांनी त्या अनोळखी महिलेवर वैद्यकीय उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली असून त्या महिलेला चांगल्या दर्जाची मोफत आरोग्य सेवा देऊन तिचा जीव वाचविण्याचे काम केले. तसेच तिचा सांभाळही केला.

जाताना त्या महिलेचा पाहुणचार म्हणून साडी-चोळी देऊन त्या महिलेस आदरपूर्वक माऊली संस्थेकडे सोपविले. १८-१0-२0०२0 रोजी सायंकाली ६ वाजता पांढरीपूल शिवारात पारस दूध फॅक्टरीसमोरील रस्त्यावरील अपघतामध्ये अनोळखी महिला गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या.

एका व्यक्तीने बेशुद्ध अवस्थेतील अनोळखी महिलेस नगर येथील विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथील डॉक्टर व स्टाफ यांनी या महिलेस तातडीने उपचार देण्यास सुरुवात केली. गेली सात दिवस तिला आयसीयूमध्ये उपचार दिल्यानंतर ती महिला शुद्धीवर आली आहे.

आता ती धोक्याच्या बाहेर आहे. तरी या परिस्थितीमध्ये ती काही बोलत नसून तिच्या स्मरण शक्तीवर परिणाम झालेला आहे. ती स्वतःचे नाव, गाव व पत्ता तसेच नातेवाईकांची माहिती सांगू शकत नाही.

तरी विघ्नहर्ताचे संचालकांनी अनेक ठिकाणी पोलिसांशी व नागरिकांशी संपर्क साधूनही तिची ओळख पटलेली नाही. तरी नांदगाव शिंगवे येथील माऊली सेवा संस्थेने विघ्नहर्ता हॉस्पिटलशी संपर्क साधून स्वतःची अम्ब्युलन्स घेऊन येऊन त्यांना आपल्या संस्थेत आधार व पालनपोषणाची जबाबदारी घेतली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24