कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बँकेने सर्व कर्मचार्‍यांचा विमा उतरविला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत.

त्याचबरोबर या व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता शहरातील एका बँकेने अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथिल अंतर्गत कोरोनासोबतच सर्वत्र कामकाज सुरु करण्यात आले आहे

.दरम्यान बँकेकडून ग्राहकांना सेवा देतांना बँक कर्मचार्‍यांना तणाव मुक्त होण्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सेवा काळात कोणत्याही कारणास्तव सेवकास मृत्यू आल्यास वारसांना 50 लाख मिळावी,

यासाठी कर्मचार्‍यांचा विमा उतरविला आहे. याबाबतची माहिती बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन रामदास वाघ,

ज्येष्ट संचालक व माजी मंत्री शिवाजी कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली. कर्मचार्‍यांनी बँकेचे काम निर्भिडपणे करावे,

यासाठी संचालक मंडळाने स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा पाच लाखांचा विमा पूर्वीच घेतला आहे. 50 लाखांचा टर्म इन्शुरन्स भारतीय एक्सा कंपनीकडून नव्याने घेतला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24