पोलिसांची आक्रमक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीला रोखण्यासाठी नूतन पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे.

नगरसह राज्यातील विविध जिल्ह्यात चारचाकी, दुचाकी वाहनांची चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने केलेल्या या कारवाईत हर्षद भगवान गगतिरे (वय 28, रा.दुसर बीड, ता.सिंधखेड ता.जि.बुलढाणा),

दिनेश राधाकिसन काठोटे (रा.हनुमान घाट, जालना) व संतोष नामदेव सानप (रा.गुंजाळवाडी, जि.बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या ताब्यातून चोरीच्या गुन्ह्यातील महेंद्रा बोलेरो, 2 बुलेट, 4 क्रूझर अशा वाहनांसह एकूण 25 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज गोसावी, संदीप कचरु पवार, संतोष लोंढे, सचिन आडबल, दीपक शिंदे, दत्ता गव्हाणे, प्रकाश वाघ, विनोद मासाळकर, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24