महाराष्ट्र

Agricultural business : शेतकऱ्यांसाठी पिंपळीची शेती ठरतेय वरदान, अनेक शेतकरी कमवतायेत लाखो रुपये; जाणून घ्या लागवडीचे तंत्रज्ञान व नफा

Published by
Ahmednagarlive24 Office

Agricultural business : तुमच्याकडे शेती असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास व्यवसाय सांगणार आहे. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला मोठी कमाई करू शकता.

कारण सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात पिंपळी या औषधी वनस्पतीची लागवड करत आहेत. पिंपळी या औषधी वनस्पतीचा होणारा उत्पादन खर्च कमी आहे. त्याच प्रमाणे पूर्ण वर्षभर हे पीक शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देत आहे.

पिंपळी या औषधी वनस्पतीचा वापर मनुष्याच्या त्याचबरोबर प्राण्यांच्या आयुर्वेदिक, युनानी, तिबेटीयन व लोक औषध मध्ये केला जातो. मसाल्यामध्ये सुध्दा पिंपळीचे उपयोग काही प्रमाणात केला जातो.

पिंपळी वनस्पती बहुवर्षीय बहुगुणीयुक्त अशी वेलवर्गीय वनस्पती आहे. इंग्रजी मध्ये या वनस्पतीला लॉंग पेपर या नावाने ओलखले जाते. तर भारतीय भाषेत विविध प्रांतात या पिकास पिंपळी, टिपली, पिप्पल,पान पिंपळी, छोटी पिप्पल, मगधी अशा इत्यादी नावाने ओळखले जाते.

या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पेपर लॉगम आहे. तसेच ही वनस्पती ‘पिपरेसी’ वनस्पती प्रजातीमधील आहे. हे पिक भारता शिवाय दक्षिण पूर्व आशियात आढळतो. पिंपळी ही औषधी वनस्पतीचे मुळ उगमस्थान भारतामधील महाराष्ट्राव्यतिरीक्त, केरळ, आंध्र प्रदेश, आसाम, बंगाल व उत्तरांचल या प्रदेशात आहे.

पिंपळी लागवडीचे तंत्रज्ञान आणि जमिन मशागत

पिंपळी वनस्पतीची लागवड करण्यासाठी जमीन जानेवारी महिन्यात उभी व आडवी खोल नांगरट करून मातीची ढेकळे बारिक करण्याकरिता 2 ते 2 कुळवाच्या पाळ्या आवश्यकतेप्रमाणे करून घेतली जाते.

नंतर दीड मीटर ते पावणे दोन मीटर लांब व 0.6 ते 0.75 मीटर रुंद एवढ्या आकाराचे वाफे किंवा वरंबे तयार करून घ्यावे लागतात. जमिनीमध्ये एका हेक्टर क्षेत्रामध्ये साधारणतः 3000 वाफे तयार केलें जातात.

पेरणी अगोदर या वाप्यांमध्ये पाटने पाणी देऊन वाफसा येण्याची वाट बघतात.या तयार केलेल्या वाप्यांमध्ये वरंब्यावर पिंपळीच्या वेलांना आधार देण्यासाठी आणि सावलीसाठी 30 ते 40 सेंटिमीटर इतक्या अंतरावर हेटा अथवा पांगरा याची लागवड करतात. त्याच बरोबर सुत्रकृमि आणि विषाणुचा जमिनीतील प्रादुर्भाव कमी करण्याकरीता जमिनेचे सोलरायझेशन करण्यात केले जाते.

पिंपळी या वनस्पतीची लागवड जानेवारी ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण करू शकतो. या पिकाच्या लागवडीसाठी स्थानिक वेलीचाच वापर नविन लागवडीकरीता करतात. केरळ कृषि काही दिवसापूर्वी विद्यापिठाने पिंपळीची ‘विश्वम’ ही सुधारीत जात तयार केलेली आहे.

पिंपळीचे लागवड करताना वेलापासून 35 डोळे असलेले, हिरवे, लसलसीत, 15-20 से. मी. लांब कांडे (बेणे) लाडवडीसाठी घेतात. पिंपळी पिकाचे लागवड करत असताना 1 लाख 8 हजार इतके बेणे प्रती हेक्टरी प्रमाणे लागतात. लागवड करण्या अगोदर बेणे ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाच्या (1 किलो 10 लिटर पाणी) द्रावणात किंवा बोडोमिश्रण टक्का द्रावणात 30 मिनीटे बुडवून त्यानंतर लावावे.

बेण्यास इंडोल बुटेरीक अॅसीड 100 पीपीएम या द्रावणात 7 मिनीटे बुडवुन लावल्यास बियांना लवकर मुळ्या फुटुन वेल लवकर वाढण्यास मदत होते. वरंब्यावर दोन वेली मधील अंतर 30 से.मी. घेऊन वरंब्याच दोन्ही बाजूवर प्रत्येक ठिकाणी 2-3 बेणे घेऊन लागवड करावी व त्यानंतर लगेच पाणी द्यावे.

प्रति हेक्टरी मिळणारे उत्पादन

पिंपळी फळांचे वाळवून साधारणपणे एक हेक्टर मधून 7 ते 10 क्विंटल उत्पादन मिळते.याची विक्री उत्पादन शेतकरी आपल्या आवश्यकते प्रमाणे स्थानिक किंवा राष्ट्रीय बाजारपेठेत करतात. पिंपळीचे पिकास सुमारे बाजारातील असणाऱ्या मागणीनुसार 250 ते 700 रु. प्रती किलो भाव मिळतो. पिंपळीचे बाजारपेठ दिल्ली, निमच, मुंबई या ठिकाणी आहेत.

Ahmednagarlive24 Office