अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. मात्र त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. काही शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या कृषी विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला.

या विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. एकीकडे विरोध सुरु असला तरी दुसरीकडे मात्र भाजपकडून या विधेयकाचे कौतुक केले जात आहे.

भाजप किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी या कृषी विधयेका शेतकऱ्यांसाठी होताच असल्याचे प्रतिपादन केले आहे. कानवडे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतीविषयक नुकतेच तीन अध्यादेश जारी केले आहेत.

शेतकर्‍यांना आर्थिक बळ देण्यासाठी आणि देशातील कृषी क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी हे उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतीचे अर्थशास्त्र ध्यानात घेता मोदी सरकाच्या या उपायांचे महत्त्व ऐतिहासिक आहे. गेली कित्येक वर्षे शेतीमाल समितीमध्येच विकला पाहिजे हा कायदा शेतकर्‍यांना सक्तीचा केला होता.

पण केंद्राने बाजार समित्यांवर असलेली प्रस्थापितांची मक्तेदारी संपवण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांच्या शेतावर व्यापारी जाऊन समोरासमोर व्यावहार करतील. बंदिस्त बाजार समितीतील लपवाछपवी बंद होईल, जाचक बाजार सेस संपुष्टात येणार आहे.

या विधेयकाचा फायदा म्हणजे शेतकरी आणि खरेदीदार यांना थेट करार करण्याची मुभा देण्यात आली आहे. कमीत कमी एक हंगाम आणि जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी शेतकर्‍याला ग्राहकाशी आपला शेतमाल विकण्यासाठी थेट करार करता येईल. शेतमाल उत्पादनाचे मूल्य करारातच समाविष्ट केलेलं असेल. निश्चित मूल्याबाबतचीही तरतूद यात आहे.

करारामध्ये काही वाद झाल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवून न्याय मिळवून देण्याची तरतूद केली आहे. कृषी विधेयकाला विरोधकांचा होत असणारा विरोध हा बेगडी आहे. हा विरोध शेतकरी विरोध आहे, असा आरोप भाजप किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24