अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाला आहे. गणेश शिवाजी जाधव (वय 27 रा. निंबळक ता. नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे.

निंबळक बायपास रोडवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक (एमएच 18 एम 5930) चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि गणेश जाधव निंबळक बायपास रोडवरील सुरेश संसारे यांच्या घरासमोरून दुचाकीवर रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला केडगावच्या दिशेने जाणार्‍या मालट्रकने धडक दिली. या धडकेत गणेश यांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24