अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील ०२, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या आता १०५ इतकी झाली आहे. नगर शहरात सिद्धार्थ नगर भागात ०६, वाघगल्ली नालेगाव भागात ०४, तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत.

याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत. *दरम्यान, जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले.

या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ०३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24