अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी एकाच तालुक्यातील 3 कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी एकाच तालुक्यातील ३ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे.

या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे.

या तीनही कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे.

मृत्यू पावलेल्या महिलांमध्ये संगमनेरातील मोमीनपुरा येथील ६५ वर्षीय महिला, नायक वाडपुरा येथील ६३ वर्षीय महिला

आणि शेडगाव येथील ६३ वर्षीय महिलेचा समावेश आहे, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

दिवसेंदिवस संगमनेर तालुक्यातेले कोरोना संकट अधिकच गडद होत आहे संगमनेर शहरात आतापर्यंत ६० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता मृतांचे प्रमाण ही वाढतच चालले आहे.

दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यात ९ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत व एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 223 झाली आहे.व कोरोनामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24