अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील मालदाड रोड येथील एक ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मात्र हा मृत्यू कोरोनाने नव्हे तर ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी मालदाड येथील एका ७२ वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून येते होती.
तिला श्वासोच्छवास घेण्यास अधिक त्रास होऊ लागल्याने तिला नातेवाईकांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
यावेळी त्यांचे स्वॅब घेतले असता ते पॉझिटीव्ह आले होते. तिच्यावर उपचार सुरु असतांनाच या महिलेने आखेरचा श्वास घेतला.
त्यानंतर जेव्हा त्यांचा मृत्युचा वैद्यकीय अहवाल आला तेव्हा ती महिला कोरोनाच्या आजाराने नव्हे तर ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने मयत झाली असे डॉक्टरांनी प्रशासनाला कळविले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews