अहमदनगर ब्रेकिंग : ८ वर्षीय चिमुरडीवर २८ वर्षीय नराधमाकडून अत्याचार पोलिसांनी केली अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या ८ वर्षीय चिमुरडीवर घराजवळ राहत असलेल्या एका २८ वर्षीय नरधमाने अत्याचार केला. ही संतापजनक घटना नगर तालुक्यातील एका गावात गुरूवार दि.२४ सप्टेबर रोजी घडली आहे.

संबंधित नराधम रशिद बेग यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केले आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील त्या गावात पीडित मुलगी व संबंधित तरूण एकाच गल्लीत राहतातग़ुरूवारी पीडित मुलीची आई घरातील काम करत होती,

तर भाऊ आजारी असल्याने घरात झोपलेला होता. दरम्यानच्या काळात मुलगी न दिसल्याने तिच्या आईने तिचा शोध घेतला मात्र ती दिसून आली नाही.

त्यानंतर काही वेळाने आरोपी रशिद यानेच तिला घरी आनून सोडले व काही एक न बोलता पळून गेला. मात्र मुलगी घामाघुम झाली होती व रडत होती.

त्यामुळे आईने रडण्याचे कारण विचारले असता,पीडित मुलीने सांगितले की, मी खेळत असताना आरोपी तेथे आला व त्याने मोबाईल खेळायला चल असे सांगून त्याच्यासोबत त्याच्या घरी घेवून गेला.

तेथे गेल्यावर त्याने दरवाजा लावून माझ्या तोंडावर रूमाल बांधला,कानात कापसाचे बोळे कोंबले व अत्याचार केल्याचे सांगितले .

त्यावरून रशिद सरदार बेग याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी रशिद याला अटक केली असून पीडित मुलीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24