अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षीय तरुणाचा ३६ वर्षीय महिलेवर हॉटेलवर नेवून बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  नगर परिसरात बुऱ्हाणनगर भागात राहणाऱ्या एका ३६ वर्षं वयाच्या महिलेला २५ वर्ष वयाच्या तरुणाने बळजबरीने हॉटेलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

हा खळबळजनक प्रकार १५/९/२०२० रोजी दुपारी २ते २.४५ च्या सुमारास घडला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिलेच्या घरी २७ एप्रिल २०२० रोजी रात्री आरोपी चेतन गोरख सुपेकर,

रा. गजराजनगर, बुऱ्हाणनगर, ता. नगर हा गेला व महिलेला म्हणाला की, मला तुला भेटायचे आहे. पहिलेने नकार दिला. आरोपी चेतन सुपेकर याने त्याच्या मोबाईलवरून महिलेच्या मोबाईलवर संदेश पाठविला.

मला तुला भेटायचे आहे. तू कोठे आहे? तेव्हा महिलेने तू मला संदेश पाठवू नको, असे सुनावले. तरीही आरोपीने पुन्हा सदर महिलेस तेलीखुंट येथे मला तुझ्याबरोबर बोलायचे असे म्हणून

बळजबरीनेबोलावून मोटारसायकलवर बसवून अरणगाव रोडने बाबुर्डी बेन गावच्या शिवारात असलेल्या एका हॉटेलात नेवून इच्छेविरुद्ध बळजबरीने जबरी संभोग केला.

तू. आरडा ओरड केला तर तुला जिवे ठार मारिल, अशी धमकी दिली. या प्रकरणी काल पिडीत महिलेने एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी चेतन गोरख सुपेकर या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळी डिवायएसपी अजित पाटील, सपोनि बोरसे यांनी भेट दिली आहे. डिवायएसी पाटील हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24