अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जामखेड तालुक्यातील जवळके येथे मित्रावरच गावठी कट्टयातून गोळीबार करणार्या आरोपीस २४ तासांच्या आत जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
अब्दुल कमाल शेख (वय ३० वर्षे रा.जवळके ता.जामखेड) असे आरोपीचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर रोजी रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास जवळके गावचे शिवारात अब्दुल कमाल शेख ,ज
खमी इसम बारीकराव शहाजी जावळे ( रा.जवळके)व इतर तीन ते चार जण बसलेले असतांना अब्दुल कमाल शेख याने विनापरवान्याचे गावठी बनावटीचे पिस्टल हाताळतांना त्याच्या पिस्टल मधुन फायर होवुन,
जखमी बारीकराव शहाजी जावळे याच्या हाताला गोळी लागल्याने त्यास उपचारासाठी मॅक्स केअर हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते.
सदर घटनेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी माहिती घेवुन यामधील फायर करणारा इसम अब्दुल कमाल शेख हा देखील अहमदनगर बाजुकडेच आलेला असल्याबाबत गोपनीय माहिती घेवुन
स्थानीक गुन्हे शाखा अहमदनगर येथे कळविल्याने स्थानीक गुन्हे शाखेचे सपोनि शिशिरकुमार देशमुख व त्यांचे सोबत विशाल दळवी, सागर ससाणे,रोहीत येमुल,उमाकांत गावडे यांनी आरोपीस जेरबंद केले.
आरोपीच्या ताब्यातून (गावठी कट्टा) व दोन जिवंत काडतुसे असा एकुण २५,४००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला आहे..
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved