अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन शेवंते (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) असे अपघात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
शेवंते हे राहुरी फॅक्टरी येथील सराफ व्यावसायिक असून बुधवारी दुपारी नगर- मनमाड रोडवरील विळद शिवारात पाण्याच्या टाकीजवळ हा अपघात झाला.
राहुरी फॅक्टरी येथील सचिन शेवंते हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच- 17 सीएच- 6212) राहुरी येथून कामानिमित्त नगरकडे चालले होते.
ते विळद शिवारातील पाण्याच्या टाकीजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकने (आरजे- 07 जेसी- 9290) पाठीमागून जोराची धडक दिली.
यामध्ये शेवंते हे मालट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर नगर-मनमाड रोडवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com