अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- शाळकरी मुलीवरील बलात्काराची आणखी एक घटना नगर जिल्ह्यात घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील चिंचोली गावात आजोबाकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाण्यातून गुंगीचे औषध टाकून अत्याचार केल्याची घटना घडली आहे .
यासंबंधीची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रविवारी पारनेर पोलिसांत दाखल केली आहे, ओळखीचा गैरफायदा घेवून हा प्रकार झाला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे . या घटनेतील आरोपी हा पसार झाला असून , पोलिस त्याचा शोध घेत आहेत .
या अल्पवयीन मुलीवर दि . १ ते २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७ ते सायं . ६ . ३० वा . चे दरम्यान अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केल आहे .यासंबंधी सविस्तर माहिती अशी की , फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही चिंचोली तालुका पारनेर येथे आजोबांच्या घरी असताना संबंधित आरोपीने घरात जावून पीडित मुलीशी बळजबरीने शारीरिक संभोग केला.
तसेच याबाबत जर तू कोणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही . अशी धमकी दिली . त्या नंतर काही दिवसांनी फिर्यादीचे मुलगी ही पारनेर बस स्टँडवर कॉलेज सुटल्यानंतर आली असता,आरोपीने परत ओळखीचा फायदा घेऊन पीडित मुलीस तुला घरी यायचे आहे काय असे म्हणून त्याचे मोटरसायकलवरून पळवून नेले.
दरम्यान शिरूर बसस्टॅन्डवर गेल्यावर पीडित मुलीने आरोपीस पाणी पिण्यास मागितले असता , आरोपीने तीला पाणी दिले. मात्र हे पाणी प्यायल्यानंतर तीला चक्कर आल्यासारखे झाल्यावर आरोपीने तिच्यावर बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला . अशी पीडितेच्या आईने फिर्याद पोलिसांत दिली आहे.