अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव कंटेनरच्या धडकेत युवती ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव :- सिन्नर – शिर्डी रोडवर देर्डे कोहाळे शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत किरण संतोष गडाख (वय १८) हिचा मृत्यू झाला, तर विकास निरगुडे हे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

घटना घडल्यानंतर कंटेनर चालक पळून गेला. यासंबंधी अधिक माहिती अशी की, फिर्यादी अशोक अर्जुन निरगुडे याचा चुलतभाऊ विकास व त्यांची भाची किरण संतोष गडाख हे शाईन होंडा मोटरसायकलवरून (क्र. एमएच १७ एक्यू ७८१०) पाथरे येथून कोपरगावकडे येत असताना देर्डे कोहाळे शिवारात सिन्नरकडून येणाऱ्या कंटेनरने (क्र. सीजी ०७ एनए ८५२७) मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या धडकेत किरण गडाख ही कंटेनरच्या खाली जावून तिचा जागीच मृत्यू झाला, तर विकास नवनाथ निरगुडे (वय ३३) हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार चालू आहेत. अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक पळून गेला. या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24