अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राहुरी कडाक्याच्या थंडीत संपूर्ण रात्र कुडकुडत राहिलेल्या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसगाव येथे उघडकीस आली.
या तरुणाचा मृत्यू थंडीने झाला की, दारू पिऊन झाला, याबाबत उपस्थितांमध्ये तर्कवितर्क लावले जात होते. शिवाजी घोडे (३५, कोळेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे.
हे वाचा :- स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी !
सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडल्याचे दिसले. घटनास्थळी लगेच बघ्यांची गर्दी जमली.
हे वाचा :- अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता !
पोलिस घटनास्थळी येईपर्यंत कोळेवाडी येथील काही नागरिक रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले होते. पोलिस उपनिरीक्षक सचिन बागूल व काॅन्स्टेबल टिक्कल यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
हे वाचा :- कॉल गर्ल गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
दुपारी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या तरूणाचा मृत्यू थंडीनेच झाला असावा, असे पोलिस व डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हे वाचा :- अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
दरम्यान, जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून येत्या काही दिवसांत कडाका आणखी वाढणार आहे.