अहमदनगर ब्रेकिंग : जिल्‍हयातील सर्व दारु दुकाने ‘या’ तारखेपर्यत बंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम :- कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर देशात व महाराष्‍ट्र शासनाने लागू केलेल्‍या लॉक डाऊनचा कालावधी विचारात घेता आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 व महाराष्‍ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्‍वये जिल्‍हयातील सर्व देशी/ विदेशी मद्य विक्री दुकाने 30 एप्रिल 2020 पर्यत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहे.

जिल्‍हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी कोरोना या विषाणूचा संसर्ग अधिक वाढ होऊ नये म्‍हणून प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून सर्व परमिटरुम व मद्यविक्री दुकाने येथे मद्यप्राशन करणा-या ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्‍हयातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यत बंद ठेवण्‍यासाठी आदेशीत करण्‍यात आले होते.

आता ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोणतही व्‍यक्‍ती , संस्‍था व संघटनांनी या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 व मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43(1) अन्‍वये कारवाईस पात्र राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24