अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी कोठडीतील आणखी १५ कैदी बाधित झाले. त्यामुळे बाधित कैद्यांची संख्या १९ झाली आहे. तीन पोलिसही अँटीजन रॅपिड चाचणीत बाधित आढळले.
इतर नऊ अशा २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एक खासगी डॉक्टरच्या डॉक्टर पत्नीलाही बाधा झाली आहे. तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २२७ झाली. एका महिलेचा मृत्यू झाला, तर २३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
कोठडीतील ३१ कैद्यांची अँटीजन रॅपिड चाचणी करण्यात आली. १५ कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील केंद्रात पाठवण्यात येणार आहे.
बेलापुरातील एक खासगी डॉक्टर बाधित झाल्यानंतर त्यांच्या डॉक्टर पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बेलापुरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या २३ झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com