अहमदनगर ब्रेकिंग : अखेर जिल्ह्यातील ‘त्या’ हॉस्पिटलला टाळे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- हॉस्पिटल बंद ठेवण्याचा आदेश असतानाही रुग्णालय सुरू ठेवल्याने शहरातील डॉ. अमोल कर्पे यांचे साईनाथ हॉस्पिटल काल दुपारी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सील करण्यात आले आहे.

साईनाथ रुग्णालयाबाबत तक्रार गेल्यामुळे हे रुग्णालय यापूर्वी बंद करण्यात आले होते. असे असतानाही या रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरूच होते.

या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवरही उपचार करण्यात येत होते. यासंदर्भात तक्रारदारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात तक्रार केली. या तक्रारीबाबत सुनावणी झाली.

न्यायालयाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर काल संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल,

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संदीप कचोरीया, डॉ. जऱ्हाड यांच्या पथकाने रुग्णालयाची पाहणी केली. सदर रुग्णालय सरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या पथकासोबत पोलीस ‘फाटाही तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या पथकाने रुग्णालयाची पुर्ण तपासणी केली. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ‘कोरोनाबाधित रुग्णावरही उपचार करण्यात येत होते.

यासाठी रुग्णालयाच्या वरच्या दोन मजल्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती असे या पथकाच्या निदर्शनास आले. यानंतर पथकाने रुग्णालयाचे वरचे दोन्ही मजले सिल केले.

दरम्यान या रुग्णालयावर वेळोवेळी कारवाई करुनही हे रुग्णालय संबंधित डॉक्टर सुरू कसे ठेवतात? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. रुग्ण सेवा व्यतिरिक्तही रुग्णालयामध्ये बकरी संशोधन केंद्रही सुरू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

रुग्णालय चालकांनी कोरोनाच्या काळामध्ये कोरोना सेंटर मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. मात्र हे अधिकृत कोरोना सेंटर सुरू झाले नव्हते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24