अहमदनगर ब्रेकिंग : कायनेटिक चौकात मोठी आग, सात दुकाने जळून भस्मसात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक परिसरात एका भंगार दुकानाला आज गुरुवारी अचानक आग लाागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सहा ते सात दुकाने, टपऱ्या या आगीमध्ये भस्मसात झाल्या आहेत.

लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सायंकाळी साडे सातच्या सुमाराला ही आग लागली.

आगीने रौद्ररूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही.

महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकासह व्हीआरडीईचे पथक प्रयत्न करत होते. पोलिस नाईक राजू जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

अहमदनगर लाईव्ह 24