अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला.
या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे.
मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, आढळगाव येथील मुकुंद वाकडे यांचा मृतदेह शेतात आढळून आला.
सुरुवातीला वीजेचा धक्का बसून हा मृत्यू झाला असावा, असा संशय आला.
परंतु त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे हा खून असल्याची खात्री झाली.
घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या खुनाच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
हा खून नेमका कोणी व का केला, याचा उलगडा होऊ शकला नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®