अहमदनगर ब्रेकिंग : अनिल राठोड यांच्यावर बहिष्कार ! ‘त्या’प्रकरणाबाबत कारवाई करण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्याबद्दल माजी आमदार यांनी अपशब्द वापरुन फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील जनतेचा अपमान केल्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला आहे.

प्रशांत गायकवाड हे दलित चळवळीतील एक कार्यकर्ते आहेत. माजी आमदार राठोड यांच्या डोक्यातील जातीय मानसिकता बाहेर पडली आहे. चुकीच्या पद्धतीने गलिच्छ भाषा वापरत माजी लोकप्रतिनिधीबद्दल जातीय मानसिकतेतून असे वक्तव्य केले असावे.

म्हणून पोलिस प्रशासनाने जलद गतीने तपास करुन माजी आ. राठोड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली.

शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे माजी आ. अनिल राठोड यांनी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाबाबत तपास करुन अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सुरेश बनसोडे, लोकशाही विचारंमथाचे सोमा शिंदे, अजय साळवे, सुशांत म्हस्के, अशोक गायकवाड, किरण दाभाडे, सुमेध गायकवाड, पवन भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढावा, बाली बांगरे, पप्पू पाटील, बंटी भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

यावेळी सुरेश बनसोडे म्हणाले की, अनिल राठोड यांनी कायम स्वतःच्या राजकारणासाठी समाजामध्ये भांडणे लावून आपला स्वार्थ साधला आहे. परंतु आता जनता हुशार झाली आहे.

यापुढील काळात समाजाबद्दल असे अपशब्द यापुढील काळात सहन केले जाणार नाही. त्यांच्यावर यापुढे समाजाच्यावतीने कुठल्याही कार्यक्रमासाठी बहिष्कार टाकला जाणार आहे. समाज त्यांना यापुढे बोलवणार नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24