अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय २२) याने शाळेतील मुलांचे खेळण्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने त्याने आत्महत्या केली असे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
राहुल सखाराम औटी (वय २२, रा. औटेवाडी, श्रीगोंदा), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहुल औटी हा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षांपासून शेती व लिंबू व्यवसाय करीत होता.
जामखेड तालुक्यातील एका मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधाला मुलीच्या नातेवाईकांचा विरोध होता. भविष्यात लग्नालाही विरोध होईल, असे त्याला वाटत होते.
येथील काहींनी फोनद्वारे त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी, असे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews