अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर मनापा, जिल्हापरिषद पाठोपाठ आता जिल्हा पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.अहमदनगर पोलीस मुख्यालयातील एका कर्मचार्यास कोरोनाची बाधा झाली आहे.
एक पोलीस कर्मचारी बाधित आढळल्याने आता जिल्हा पोलीस दलात करोनाने प्रवेश केला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
आता जिल्हा पोलीस दलातही करोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे.मुख्यालयातील तो करोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी किती लोकांच्या संर्पकात आला याचा शोध घेतला जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com