अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यात व शहरात आज एकूण पाच रुग्ण मिळून आले आहेत. सकाळी जनता नगर येथील लाँण्ड्री चालकास कोरोनाची बाधा झाली होती.
त्यानंतर आता सायंकाळी पुन्हा चौघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यात निमोण येथे 50 वर्षीय पुरूष, नांदुरखंदुरमाळ येथे 65 वर्षीय पुरूष तर शहरातील गणेश नगर येथे 34 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ही दोघे स्थानिक कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बाधा झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात 185 रुग्ण कोरोना बाधित तर 13 जणांचा मृत्यू अशी आकडेवारी झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews