अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने आता अनेक सरकारी कार्यालयात घुसखोरी केली आहे. जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ पदाधिकार्यांचा कार्यालयातील कर्मचारी बुधवारी करोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे कर्मचार्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर ‘त्या’ पदाधिकाऱ्याचे दालन व इतर दोन विभाग बंद केले आहेत. तसेच हा मजला सॅनिटाइझ केला आहे. झेडपीत कर्मचारी वगळता इतरांना प्रवेश बंद केला आहे.
जिल्हा परिषदेतील पहिल्या मजल्यावरील विभागातील एका कर्मचार्याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा कर्मचारी जिल्हा परिषदेत आलेला नसला तरी कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
दरम्यान पुढील आठवड्यात जिल्हा परिषद प्रशासनाने २१ पासून जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्याची प्रक्रिया ठेवली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत कर्मचार्यांची बदली होणार असल्याने यावेळी करोना संसर्गापासून प्रशासन कसा बचाव करणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
विशेष म्हणजे या बदली प्रक्रियेला पदाधिकारी स्वत: उपस्थित राहणार आहेत. यामुळे त्यांच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी पाहणी करून सूचना केल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews