अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे ०२ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर १३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या चाळीस वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा.
वाशी मुंबईहून शेवगाव येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
संगमनेर येथील खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या ०३ रुग्णांचा जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश.
आज जिल्ह्यातील १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त, त्यातील १३ व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला तर २ व्यक्तींना पीएमटी लोणी येथून डिस्चार्ज देण्यात आला.
यात, राहाता तालुक्यातील ०२, संगमनेर ०६, शेवगाव ०१, कर्जत – ०२, अकोले ०२, नगर शहर ०१, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्हयातील अॅक्टिव केसेस ७०
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१७
(महानगरपालिका क्षेत्र ४७, अहमदनगर जिल्हा १११, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४९)
एकूण स्त्राव तपासणी ३०७३
निगेटीव २७३७ रिजेक्टेड २७ निष्कर्ष न निघालेले १८ अहवाल बाकी ७९
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews