अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : जामखेड तालुक्यातील मोहरी येथे एक व लोणी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आसल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मोहरी व लोणी येथील मुख्य प्रवेशद्वारावर पत्रे अडवे लावुन हा रस्ता बंद केला आहे. सध्या जामखेड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकुण संख्या चार झाली आहे.
जामखेड तालुक्यातील मोहरी येथील एका व्यक्तीला कोरोना ची लागण झाली त्यामुळे मोहरीगाव मुख्यप्रवेश द्वार पत्रे मारून पूर्ण सील करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील व्यक्तींना गावाच्या बाहेर आणि बाहेरील व्यक्तीला आत गावात येण्यास मज्जाव करण्यात आले आहे.
मोहरी गावात अढळुन आलेली बाधित व्यक्ती काही दिवसांपूर्वी गावातील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती . त्यामुळे अनेक व्यक्ती या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्या आसल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासनपुढे मोठे आहवान ठरणार आहे.
मोहरी येथील कोरोनाबाधीत रुग्ण हा चार दिवसापूर्वी खर्डा येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यासाठी आला होता .त्यामुळे खबरदारी चे उपाय म्हणून सकाळी खर्डा ग्रामपंचायत या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांना बोलावून व परिस्थितीची माहिती घेऊन खर्डा येथील सर्व बाजारपेठ पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews