भाजपाच्या माजी खासदाराच्या मुलाला चमकोगिरी चांगलीच भोवली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

 

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक सुवेद्र गांधी यांना चमकोगिरी चांगलीच भोवली आहे. त्यांच्या विरुद्ध नगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी रात्री  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महापालिकेकडून परवानगी नसतानाही शहरात परस्पर औषध फवारणी करणारे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे कीटक संहारक सीताराम शितोळे यांनी फिर्याद दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात औषध फवारणीसाठी राजकीय कार्यकर्ते, नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. खासगी व्यक्तींकडून सुरू असलेल्या औषध फवारणीमध्ये अवाजवी व बेसुमार औषध फवारणी झाल्यास नागरिकांसाठी ती अपायकारक ठरण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्य शासनाने या संदर्भात निर्णय घेऊन संबंधित महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेकडूनच औषध फवारणी केली जाईल, खासगी व्यक्ती, सोसायट्यांनी परस्पर औषध फवारणी करू नये, असे आदेश दिले आहेत. कीटक संहारक शितोळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरातील गंजबाजार, कापडबाजार, पारशाखुंट, जुना बाजार येथे सुवेंद्र गांधी व त्यांच्या दोन अनोळखी सहकार्‍यांनी महापालिकेची परवानगी नसताना औषध फवारणी केली. त्यामुळे हा परिसर निर्जंतूक झाल्याचा चुकीचा संदेश नागरिकांमध्ये गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार पोलिस ठाण्यात भादवि कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24