अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणून नगर जिल्ह्यात १५ मार्चपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींना फिरण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन, जिल्हादंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन
अहमदनगर जिल्हा महसूलस्थळ सीमेच्या हद्दीमध्ये या आदेशान्वये दि.23/02/2021 रोजी 00.00 पासुन ते दि.15/03/2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालील बाबींस मनाई करीत आहे.
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-:- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते. मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. तसेच कोरोनाचा धोका वाढू लागल्याने प्रशासन देखील पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे.
दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातही तब्बल 178 रुग्ण वाढले आहेत याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे –