अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका साखर कारखान्यात समीर बिरोजभाई शेख (वय १५) या बालकामगाराचा मृत्यू झाला.
साखर कारखान्यात बगेस विभागात काम करताना बेल्टमध्ये त्याचा डावा हात अडकून निकामी झाला. यात त्याच्या छातीला व डोक्याला गंभीर मार लागला होता. पुणे येथे उपचार सुरु असताना त्याचा आज दुपारी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.
मात्र पोलिसांकडे कोणतीही नोंद नव्हती. समीर शेख हा बालकामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी घरच्या व्यक्तीबरोबर मंगळवारी (ता. १७) कारखान्यात कामाला गेला.
तेथे त्याला बग्यास विभागात भुसा ढकलण्याचे काम होते. ते करत असताना अचानक मशीच्या लोंखडी बेल्टमध्ये त्याचा डावा हात अडकला. तो मोठमोठयाने ओरडल्यानंतर भोवतालच्या कामगारानी धाव घेऊन मशीन बंद करत त्याला बाहेर काढले.
तोपर्यंत त्याचा डावा हात निकामी होवून छातीला व डोक्याला मोठा मार लागला. कारखाना प्रशासनाने रूग्णवाहीका बोलावून पुणे येथे उपचारासाठी नेले. परंतु समीरचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved