अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- अलीकडील काळात सोशल मीडियातील गैरप्रकार व गुन्ह्याची संख्या चांगलीच वाढली आहे, सोशल मिडीयावरील लोकप्रिय साईट फेसबुक वरही हे प्रकार सर्रास होत असून हॅक करून बनावट खाते तयार तसेच फ्रेंडलिस्टमधील काहींकडून पैशाची अवास्तव मागणी केली जाते. 

मात्र आता हॅकर्सने मोठी मजल मारली असून चक्क अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांचेच बनावट  फेसबुक अकाउंट तयार केल आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनीच त्यांच्या स्वतःच्या अकाउंटवर पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली आहे, या विरोधात योग्य ती कारवाई करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

जिल्हाधिकारी भोसले यांची फेसबुक पोस्ट

नवीन अकाउंट वरून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारू नयेत असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. यापूर्वीही जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे नागरिकांची फेसबुक अकाउंट बनविण्याचे तसेच काहींचे अकाउंट हॅक होण्याचे प्रकार घडले आहेत. आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट तयार झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हल्ली प्रत्येकाचा सोशल वावर वाढला आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर असणे नित्याचे झाले आहे. हा वावर वाढल्यामुळे हॅकिंगसारख्या गैरप्रकारांनाही खुले रान मिळाले आहे. फेसबुकचे अकाउंट हॅक होणे ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे.

महत्वाची माहिती : हॅक अकाउंट पुन्हा सुरु कसे करावे ?

जर तुमचे फेसबुकचे अकाउंट कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते पुन्हा तुमच्या नियंत्रणाखाली आणणे फारच सोपे आहे. खालीलप्रमाणे कृती केल्यास फेसबुक अकाउंट पुन्हा वापरण्या योग्य होऊ शकते.

Facebook.com/hacked या लिंकवर जा. तेथे एक बटन दिसेल, ज्यावर My account has been Compromised असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक स्क्रीन समोर येईल. तेथे पासवर्ड देऊ नका. त्यानंतर Forgotten your passwordवर क्लिक करा.

आता जी स्क्रीन येईल, त्यावर यूजरनेम अथवा ई-मेल किंवा तुमच्या अकाउंटशी जोडलेल्या मोबाइल क्रमांक या तिन्हीपैकी एकाची माहिती द्या. जर हॅक करणाऱ्याने ई-मेल आणि मोबाइल क्रमांक बदलला असेल, तर तुम्ही यूजरनेम टाका. कारण हॅकर यूजरनेम बदलूच शकत नाही.त्यानंतर फेसबुक तुमच्या अकाउंटला सर्च करून समोर आणेल. आता पासवर्डच्या जागी हॅक करण्यापूर्वीचा किंवा त्या आधीचा पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.

आता स्क्रीनवर एकापेक्षा अधिक ई-मेलचे पर्याय दिसून येतील. त्यानंतर त्यापैकी कोणत्या ई-मेल आयडीचा वापर करून तुम्ही अकाउंट चालू ठेवणार आहात, या विषयी विचारणा करण्यात येईल. त्यापैकी एक ई-मेल निवडल्यानंतर अन्य ई-मेलमधून तुमचे फेसबुक अकाउंट लॉग इन करण्याची सुविधा काढून घेतली जाईल. त्यानंतर तुम्ही निवडलेला एक ई-मेल आणि नव्या पासवर्डच्या मदतीने फेसबुक पुन्हा कार्यरत ठेवू शकाल.

फेसबुकद्वारा अकाउंट सर्च करून सर्व माहिती समोर आणल्यानंतर जर तुम्ही पासवर्ड देऊ इच्छित नसाल, तर कोणताही पर्याय निवडू नका. तुम्ही फक्त No longer have access to these?वर क्लिक करा. त्यानंतर I can npt access my email account वर क्लिक करा.

त्यानंतर फेसबुककडून How can we reach you? अशी विचारणा करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही ई-मेल किंवा मोबाइल नंबर द्या. जेणेकरून फेसबुककडून तुम्हाला लिंक पाठविण्यात येईल. त्यानतंर तुम्ही पासवर्ड पुन्हा रिसेट करू शकता.त्यासाठी तुम्ही कोणत्याही परिचिताच्या ई-मेल किंवा मोबाइलच्या क्रमांकाचा उपयोग करू शकता. त्यानंतर व्यक्तिग​णिक फेसबुकचा व्यवहार बदलतो. फेसबुकतर्फे विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची कल्पना करू शकत नाही.

तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर केलेल्या अॅक्टिव्हिटिजवर आधारीत प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही त्या प्रश्नांची खरी आणि योग्य उत्तरं दिली तर काही मिनिटांत किंवा काही तासांत तुम्ही दिलेल्या ई-मेल किंवा मोबाइल क्रमांकावर नवीन पासवर्ड पाठवला जातो.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24