अहमदनगर ब्रेकिंग : अनैतीक संबंधातून स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकले.!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले :- तालुक्यातील देवगाव परिसरात एका तास ते आठ महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकून दिलेल्याचे आढळले आहे. हे अर्भक मृत आवस्थेत सापडले असून ते मारले की मेल्यानंतर फेकून दिले. हे अद्याप समजले नसून या बालकाचा बहुतांशी भाग पक्षांनी खाल्याचे निदर्शनास आले.

देवगावच्या परिसरात कावळ्यांनी जास्त कालवाकालव सुरू केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व त्याचा पंचनामा करुन अज्ञात व्यक्तीवर 318 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवगाव परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये एका दाट जंगलाच्या परिसरात कावळ्यांची जास्तच कावकाव सुरू झाली होती. त्यामुळे, तेथील पोलीस पाटील बालाजी भांगरे, सरपंच सचिन भांगरे यांना संशय आला होता.

त्यांनी घटनेची शाहनिशा करण्यासाठी थेट जंगल गाठले असता त्यांना तेथे एक अर्भक दिसून आले. त्यांनी सदरची बाब राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी नितीन पाटील यांना कळविली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट घटनास्थळ गाठले.

काट्याची वाट तुडवत प्रचंड वास येत असतांना त्यांच्या पथकाने ते पक्षांनी चोची मारुन खाल्लेले निम्मे अर्भक ताब्यात घेतले. डॉक्टरांच्या समक्ष त्याचा पंचनामा झाला.अनैतीक संबंधातून या अर्भकास जंगलात फेकल्याची चर्चा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24