अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात काल सकाळी दहा वाजता घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात एक आदिवासी कुटुंब राहते. तेथील एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता.
याप्रकरणी तिने पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला होता. मात्र, माझ्यावर अन्याय झाला आहे
त्यामुळे मला कायदेशीर न्याय हवा आहे असे म्हणत ही तरुणी तिच्या मतावर ठाम होती. त्यामुळे, आरोपी हे थेट या आदिवासी तरूणीच्या पालावर गेले आणि तिला बाहेर बोलावून तिच्या दहा वर्षांच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल फेकून तिला पेटून दिले.
यात या मुलीसह तरुणीच्या अंगावर असणार्या कपड्याला आग लागून तीन गंभीर रित्या भाजली आहे. यावेळी तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
हा प्रकार पोलिसांना समजला असता पोलीस उपाधिक्षक अजित पाटील पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर दुसर्या दिवशी पीडित तरूणीच्या फिर्यादीनुसार सुपा पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यात राजाराम गणपत तरटे, अमोल राजाराम तरटे (रा. पळवे, ता. पारनेर) यांच्या विराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved