अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात 30 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.
पिडीत महिला कामानिमित्त आष्टी येथून अहमदनगर येथे आली होती. काम आटोपल्यानंतर ती रस्त्याने निंबोडी शिवारातून जात असताना तिच्यावर तीन नराधमांनी सामुहिक अत्याचार केला.
त्यानंतर पिडीतेने भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय माळी याच्यासह त्याच्या दोन साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे.