अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नेवासा तालुक्यात दारू विकण्यास विरोध करणाऱ्या तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रवरासंगम परिसरात प्रवरा नदीपात्रात किरण सुभाष हिवाळे, वय २३ वर्ष रा.भिवधानोरा,गंगापूर,ता.वैजापूर या तरुणाचा दोन ते तीन दिवसापूर्वी खून करण्यात आला.
दोन आरोपींनी दलित वस्तीमध्ये दारू विकण्यास विरोध केल्याने धारदार हत्याराने किरण हिवाळे या तरुणास भोसकून ठार मारले व त्याचे हातपाय दोऱ्याने बांधून मारले.
त्यानंतर दोरखंडास दगड बांधून किरण हिवाळे याचा मृतदेह प्रवरा नदीपात्रात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून दिला.
याप्रकरणी नेवासा पोलिसांनी मयत किरण याचे वडील सुभाष शिवराम हिवाळे यांच्या फिर्यादीवरुन खून करणारे
आरोपी कानिफ माणिक मावस,रा.भिवधानोरा,ता.गंगापूर व अशोक तुपे,रा.भेंडाळा,ता.गंगापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.